सातारा जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना शनिवारी साहित्याचे होणार वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभुत साधनांचे वाटप करण्यात येणार आहे. दि. 25 नोव्हेंबर रोजी सातारा तालुक्यामधील दिव्यांग व्यक्तीना साहित्याचे सकाळी 11 वाजता सातारा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात वाटप केले जाणार आहे.

सातारा तालुक्यातील ज्या दिव्यांग व्यक्तींचे मोजमाप घेण्यात आलेले होते. त्या दिव्यांग व्यक्तींनी दि. 15 ते 28 डिसेंबर 2021 तसेच 21 फेब्रुवारी ते 4 मार्च 2022 या कालवधीत मोजमाप शिबिरामध्ये देण्यात आल्या आहेत.

पोचपावतीसह तसेच दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, युडीआयडीकार्ड/ युडीआयडीकार्ड साठी नोंदणी केलेली पावती, आधारकार्ड तसेच मतदान कार्ड यांच्या छायाकिंत प्रतीसह साहित्य वाटप कार्यक्रमास उपस्थित रहावे असे, आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे यांनी केले आहे.