सातारा प्रतिनिधी | वाई शहरातील गणपती आळी येथे जुन्या असलेल्या सकुंडे वाड्याला आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने नागरिकांची धावपळ उडाली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाई शहरात असलेल्या गणपती आळी येथे जुना सकुंडे वाडा आहे. या ठिकाणी वाड्याला अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले. वाड्यातून धूराचे लोट बाहेर येताना पाहिल्यानंतर नागरिकाचा एकच गोंधळ उडून गेला. आगीची माहिती मिळताच वाई पालिकेचा अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी तत्काळ दाखल झाला. तसेच पाण्याच्या साह्याने आग विझविण्याचे काम केले.
वाई येथे 100 वर्षे जुन्या वाड्याला भीषण आग
अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल pic.twitter.com/NYGmhSiWh6
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 9, 2023
दरम्यान वाड्याला लागलेल्या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, तळमजल्यात काही व्यवसायिकांची दुकाने असल्यामुळे त्यातून काही झाल्याने आग लागली असावी अशी घटनास्थळी चर्चा सुरू आहे. या भीषण आगीच्या घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली असून अग्निशामक दलास आग विझवण्यात यश आले आहे. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली आहे.