सातारा प्रतिनिधी | सातारा शहरानजीक असलेल्या परळी येथील वन परिमंडल कार्यालयात अचानक भीषण स्फोट झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. या स्फाेटामुळे वन परिमंडल कार्यालय परिसर हादरून गेला. या घटनेत कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा नजीक परळी येथील वन परिमंडल कार्यालयामध्ये आज पहाटेच्या सुमारास ऑफिस स्टोअर मध्ये जोरात फोट झाल्याचा आवाज परिसरातील नागरिकांच्या कानावर आला. यानंतर नागरिकांनी ऑफिस च्या दिशेने धाव घेतली.
नागरिकांनी कार्यालयात जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी कोणीच आढळून आले नाही. या स्फोटाची भीषणता एवढी होती की स्टोअर रूम ऑफिस मधील खिडक्या दरवाजे उडून बाहेर पडले. या घटनेत कार्यालयाच्या छताचे नुकसान झाले आहे. या घटनेचा अधिक तपास सातारा पोलिसांकडून केला जात आहे.