सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पळशी या गावाने अभिनंदनास्पद आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. गावच्या ग्रामपंचायतीने एक जाहीर सूचना प्रदर्शित केली आहे.
दि. २२ जानेवारीला होणार्या सोहळ्यानिमित्त पळशी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील मांसविक्रीची दुकाने, तसेच मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या जाहीर सूचना देण्यात आल्या आहेत.
ग्रामपंचायतीच्या सूचनेमध्ये म्हटले आहे की, गावामध्ये श्रीरामाचे मंदिर आहे. तेथे २२ जानेवारी या दिवशी भव्य सोहळा आणि श्री रामनाम संकीर्तन यांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गावातील सर्वच मांस आणि मद्य विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत. सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.