कराड प्रतिनिधी | कारगिलमधील लेह येथील बर्फाळ प्रदेशातील एका दुर्घटनेत भारतीय सैन्यदलातील इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले वसंतगड (ता. कराड) येथील नायब सुभेदार जवान शंकर बसाप्पा उकलीकर हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी ११:३० वाजता येथील कराड येथील विजय दिवस चौकात दाखल झाले. या ठिकाणी त्यांना माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, कराडचे तहसीलदार विजय पवार, कराड नगपलिका उपमुख्याधिकारी विशाखा पवार, माजी नगरसेवक सौरभ पाटील, विजय वाटेगावकर यांच्यासह विजय दिवस समारोह समिती, त्रिशक्ती फाऊंडेशन, पालिका, कराड शहरातील नागरिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
कराड येथील विजय दिवस चौकात शहीद जवान नायब सुभेदार शंकर उकलिकर यांचे पार्थिव दाखल होताच युवकांच्या वतीने वीर जवान शंकर उकलिकर अमर रहे, भारत माता की जय, असा जयघोष केला. यावेळी विजय दिवस चौकात जवान शंकर उकलिकर यांना विविध मान्यवरांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे गाडीतून कराड शहरातून कोल्हापूर नाकापर्यंत नेण्यात आले.
हुतात्मा जवान शंकर उकलीकर यांचे पार्थिव कराडात दाखल; विजय दिवस चौकात मान्यवरांकडून अभिवादन
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अभिवादन पदयात्रेत झाले सहभागी pic.twitter.com/75cjp3GVrj
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 13, 2023
यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयातील युवक. शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. विजय दिवस चौकात अभिवादन करण्यात आल्यानंतर वीर जवान शंकर उकलिकर यांचे पार्थिव पुढे दत्त चौकातून कोल्हापूर नाका येथून वरुंजी फाटा येथे वसंतगड कडे रवाना झाले.