महाराष्ट्र दिनी उद्या कराडात मराठी गीतांचा कार्यक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड कर्मभूमीत महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उद्या बुधवार दि. १ मे रोजी ६४ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त महंमद रफी कॅराओके म्युझिक अॅकॅडमी कराड सुनहरी सरगम के सितारे प्रस्तुत शुक्रतारा मंदवारा या लोकप्रिय मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार प्रमोद तोडकर आणि महागुरू आसिफ बागवान यांनी दिली.

कराड प्रीतिसंगम घाट येथे बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. रसिक प्रेक्षकांनी या सदाबहार कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कराड येथे १ मे च्या निमित्ताने उद्या महंमद रफी कॅराओके म्युझिक अॅकॅडमी कराड सुनहरी सरगम के सितारे प्रस्तुत शुक्रतारा मंदवारा या लोकप्रिय मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यास कराडकर रसिक प्रेक्षकांनी व नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घेणे आवश्यक आहे.