कराड प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण केले असून उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृतीही खालावत चालली आहे. दरम्यान, वडीगोद्रीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आज कराड येथील दत्त चौकात कराड तालुका मराठा समाज बांधवांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी 50 टक्याच्या आतील मराठा समाजाला ओबीसीमधून मराठा आरक्षण द्यावे तसेच सगे सोयरे अध्यादेश काढणे, मराठा आंदोलकांच्या वरती लादलेले गुन्हे मागे घेणे आदी मागण्या मान्य करून मनोज दादा जरांगे पाटील यांचे उपोषण थांबवावे, हे जर झाले नाही तर राज्य सरकार, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांला मराठा समाजाच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला.
कराड येथील दत्त चौकात मराठा समाजबांधवांनी आज रस्त्यावर ठिय्या मांडत सत्ताधारी आणि विरोधकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कराड येथील दत्त चौकात असे महाराष्ट्रातील पहिले आंदोलन करण्यात आले कि ज्यामध्ये राज्य सरकार सत्ताधारी सर्व पक्ष आणि विरोधातील सर्व पक्ष यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी मराठासमाज बांधवाच्या वतीने प्रांताधिकारी व तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, दिनांक 16 सप्टेंबर 2024 रात्री 12 वाजले पासून मनोज दादा जरांगे पाटील साहेब है मराठा समाजाला 50% च्या आतून ओबीसी मधून मराठा आरक्षण मिळण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आब रोजी त्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे… तरी राज्य सरकार यवरती कोणतीही भूमिका घ्यायला तयार नाही तसेच विरोधवाकर चोणतीही भूमिका घ्यायला तयार नाहीत… आणि दुसऱ्या बाजूला मा.मनोज दादा जराग पाटील यादी तब्येत खूपच खालावलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण मराठा समाज हा अतिशय दुखात आहे आपला नेता मनोज दादा जरांगे पाटील यांचे हाल आता मराठा समाजाला बघवत नाहीत.
त्यामुळे 50% च्या आतील मराठा समाजाला ओबीसी मधून मराठा आरक्षण द्यावे तसेच सगे सोयरे अध्यादेश काढणे, मराठा आंदोलकांच्या वरती लादलेले गुन्हे मागे घेणे हया व इतर मागण्या त्वरित मान्य करून मनोज दादा जरांगे पाटील याचे उपोषण थांबवावे आणि त्यांच्या शरीराचे हाल थांबवावे. जर लवकरात लवकर झाले नाही तर राज्य सरकार, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या सर्वाना सकल मराठा समाज च्या असंतोषाला सामोरे जावे लागेल आणि तिथून पुढे सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बिघडली तर त्याला सर्वस्वी प्रशासन राज्य सरकार, सताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष है सर्व जबाबदार राहतील, अशा इशारा देखील मराठा बांधवांच्या वतीने यावेळी देण्यात आला.