मराठा बांधवांनी रोखला विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग, अर्धातास वाहतूक ठप्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कराड तालुक्यात मराठा बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोकणचे प्रवेशद्वार असणारा विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग मराठा बांधवांनी आज सुमारे अर्धा तास रोखून धरला. यामुळे या महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी कोणताही अडथळा येऊ नये म्हणून ११.३० च्या सुमारास मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. तांबवे फाटा (ता. कराड) या ठिकाणी सुपने, तांबवे परिसरातील मराठा बांधवांनी रस्त्यावर ठाण मांडून महामार्ग रोखला. ‘एक मराठा, लाख मराठा’ आणि ‘मनोज जरांगे-पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

दरम्यान, उद्यापासून दि. 25 फेब्रुवारीपासून राज्यभरात गावागावात ग्रामपंचायत किंवा मंदिरासमोर धरणे आंदोलन करण्याचे अवाहन जरांगे यांनी केलंय. तसेच 25 पासून होणाऱ्या धरणे आंदोलना दरम्यान दररोज आपल्या सगयासोयऱ्याच्या मागण्यांचे निवेदन शासनाच्या प्रतिनिधीला द्यायचे आहे, हे निवेदन गावात 10 च्या आत शासनाचा प्रतिनिधी आला पाहिजे तो न आल्यास, पुन्हा रास्ता रोको आंदोलन करायचा, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.