जिल्ह्यातील ‘या’ 2 गावांनी मिळवले ग्रामस्वच्छता अभियानात नावलौकिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हयातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी आणि कराडमधील बनवडीची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या गावांचा पुरस्कार वितरण सोहळा दि. ५ मार्च रोजी होणार आहे.

जिल्हा परिषदेचा राज्यस्तर तसेच दिल्लीतही गाैरव झाला आहे. आताही सातारा जिल्ह्याने स्वच्छतेची परंपरा कायम राखत याहीवर्षी राज्यात पुरस्कार पटकावला आहे. तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१८-१९, २०१९-२० तसेच २०२०-२१ आणि २०२१-२२ (एकत्रित एक स्पर्धा) या वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय, तृतीय पुरस्कार प्राप्त ठरलेल्या व विशेष पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतीचा पुरस्कार वितरण सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

५ मार्च रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे. तसेच दि.१ मार्च रोजी पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात विभागात प्रथम क्रमांक मिळवलेल्या ग्रामपंचायतींचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती देण्यात आली.