साताऱ्यात भर सभेत स्टेजवर मनोज जरांगे पाटलांना आली चक्कर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षण रॅलीसाठी राजधानी साताऱ्यात दाखल झाल्यानंतर त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मात्र, मराठा समाजबांधवांना संबोधित करत असताना त्यांना अचानक चक्कर आली. स्टेजवर चक्कर आल्यामुळे ते अचानक खाली बसले. दरम्यान, मराठा समाज बांधवानी त्यांना सावरत पाणी दिले व रुग्णालयात उपचार घेण्याची विनंती केली.

कोल्हापूरहून कराडमार्गे साताऱ्यात दाखल होताच जरांगे पाटील यांचे साताऱ्यातील पोवई नाका येथे मराठा समाज बांधवानी जल्लोषात स्वागत केले. या ठिकाणी छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर जरांगे-पाटील यांच्या रॅलीला सुरुवात झाली. ऐतिहासिक गांधी मैदान येथे पोहचल्यानंतर जरांगे-पाटील यांनी सभेच्या स्टेजवर जात समाजबांधवांना संबोधित करण्यास सुरुवात केली.

यावेळी काही मिनिटे बोलल्यानंतर त्यांना अचानक भोवळ आली, हात थरथरू लागले आणि ते स्टेजवरच खाली बसले. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी जरांगे पाटील यांना पिण्यास पाणी देत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला.

भोवळ येण्यापूर्वी जरांगे पाटलांनी केलं ‘हे’ आवाहन

यावेळी सभेच्या सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, संकट तुमच्या समोर उभे आहे. तुम्ही त्यांचे ऐकले तर तुमचे लेकर बरबाद होणार आहेत. राजकीय नेत्यांनी दबाव आणला आणि घरात बसला तर पुन्हा अशी लढाई होणार नाही. प्रत्यक्ष मैदानात यावे लागणार आहे. दुकानात कामाला असाल तर एक दिवसकामाला सुट्टी द्या आणि प्रत्यक्ष या. शिक्षकांनी सुट्टी काढून या, मराठ्यांच्या राजधानीत येऊन सांगतो, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

तर इंगाच दाखवतो…

साताऱ्यात दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी जात पडताळणीवरून प्रशासनावर निशाणा साधला. यावेळी ते पुढे म्हणाले की, व्यवसाय बंद करून बाहेर यावे लागणार आहे. संकट तोडायची जबाबदारांची सर्वांची आहे. नेतेही त्यांच्या सोबत आहेत. ओबीसी आणि मराठ्याचे पोरांना नोकऱ्या लागल्या तर यांच्या प्रचाराला कोण ? जात पडताळणी जर आठ दिवसात नाही मार्गी नाही लावल़ी तर इंगा दाखवतो. मी घरी बसणार पण मी पाडणार म्हणजे पाडणार आहे. येथील सुध्दा जर पाडायचे म्हटले तर पाडणार म्हणजे पाडणार आहे. नाही पाडलात तर नाव बलणार. मराठ्याच्या अधिकाऱ्यांना त्रास दिला तर आपण त्यांच्या पाठिशी उभ राहिले पाहिजेत, असे जरांगे पाटील यांनी म्हंटले.