हा जरांगे पाटील समाजाच्या पाठीशी मरेपर्यंत उभा राहणार – मनोज जरांगे पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । “एक मराठा लाख मराठा…, कोण म्हणतो देत न्हाय… घेतल्याशिवाय राहत न्हाय…, अशा घोषणा देत कराड येथील वारुंजी फाटा येथे मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा समाज बांधवांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जरांगे पाटील यांना जेसीबीच्या माध्यमातून १५ फुटी हार घालण्यात आला. यावेळी आपल्या मराठा समाजा हिणवण्याचे काम काही जणांकडून केले जात आहे. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवावे, हा जरांगे पाटील समाजाच्या पाठीशी मरेपर्यंत उभा राहणार आहे. लढून जिंकायचं आहे आपल्याला असे मनोज जरांगे पाटील यांनी कराड येथे म्हंटले.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगेसोयरे यांना कुणबी दाखल्यांचे आरक्षण लागू करावे यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्याकडून आज साताऱ्यात शांतता रॅली काढण्यात येणार आहे. दरम्यान, आज दुपारी कोल्हापूरवरुन कराडमार्गे साताऱ्याकडे जात असताना जरांगे पाटील यांनी कराड येथील वारुंजी फाटा येथील पाटण तिकाटणे येथे मराठा बांधवांची भेट घेतली. यावेळी मराठा समाज बांधवांच्या वतीने जेसीबीव्दारे फुलांचा वर्षाव करुन जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, आपल्या मराठा समाजाला गोरगरिबांना विनाकारण नाव ठेवली जात आहेत. आपल्या मराठा समाजाला हिंणवायचं सध्या काम सुरू आहे. कोणी कितीही हिणवलं तरी मी मराठा समाजाच्या पाठीशी राहणार आहे. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पक्ष सोडून आपल्या लेकरांसाठी एकजुटीने राहावे. मराठा एकत्रित नाही आला की संधीसाधू लोक एकत्र येतात. लोकांना बोलायला जागा ठेवू नका, मराठा एक होत नाही. आपल्याला लढून जिंकायचं आहे. मी बांधावर भाकरी खाणारा मी मराठा आहे.

यावेळी जरांगे पाटील यांचे आगमन होताच हजारो मराठा समाज बांधवानी एक मराठा लाख मराठा असा जयघोष करत क्रेनच्या सहाय्याने २५० किलोचा १५ फुटी हार घालून जरांगे पाटील यांचे स्वागत केले. समाज बांधवांच्या स्वागतानंतर मनोज जरांगे पाटील यांनी गाडीतून नखाली उतरून समाज बांधवांशी संवाद साधला. संवाद साधल्यानंतर ते सातारच्या दिशेने रवाना झाले.