कराडात पंतप्रधानांच्या ‘मन कि बात’ला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांची उपस्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण रविवार दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता कराड येथील वेणुताई चव्हाण सभागृहात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशातील नागरिकांशी संवाद साधत असतात. या कार्यक्रमातून मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या विविध विषयांवर ते जनतेला संबोधित करत असतात. या महिन्यातील ‘मन की बात’ कार्यक्रम रविवारी (ता. ३१) आकाशवाणी व दूरचित्रवाणीवरून प्रसारित केला जाणार असून, या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सकाळी १० वाजता कराड येथील वेणुताई चव्हाण सभागृहात करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार प्रमुख उपस्थित राहणार असून, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी केले आहे.