महाबळेश्वरमधील लॉडविक पॉईंटवरून 550 फूट खोल दरीत उडी मारून एकाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरातील लॉडविक पॉईंटवरून एका व्यक्तीने 550 फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. गंभीर जखमी झाल्यामुळे या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनी दरीतून मृतदेह बाहेर काढला आहे. या घटनेमुळे महाबळेश्र्वरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

संजय वेलजी रुघाणी (वय 52 रा.शांतीनगर, मिरा रोड) असे उडी घेतलेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी महाबळेश्र्वर येथील असलेल्या लॉडविक पॉईंट या निसर्गरम्य ठिकाणी संजय वेलजी रुघाणी सायंकाळच्यावेळी फेरफटका मारत होते. काही वेळानंतर सुमारे ५५० फूट खोल दरीत ते कोसळली. कोणीतरी दरीत कोसळली असल्याचे आजूबाजूच्या पर्यटकांनी पाहिल्यानंतर याची चर्चा महाबळेश्र्वर शहरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सबंधित व्यक्तीचा मृतदेह काढण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना बोलावण्यात आले. दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी अथक प्रयत्नातून मृतदेह बाहेर काढला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून तपास सुरू केला जात आहे.