मल्हारपेठ पोलिसांनी गहाळ, चोरी झालेले 3,73,000 किंमतीचे 17 मोबाईल केले हस्तगत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | नागरिकांचे गहाळ आणि चोरीला गेलेले पावणे चार लाख रुपये किमतीचे 17 मोबाईल मल्हारपेठ पोलिसांनी हस्तगत केले. पोलिसांकडून ते मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. हरवलेले आणि चोरी झालेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी मल्हारपेठ पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले.

पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधिक्षक सविता गर्जे यांचे मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. चेतन मछले यांनी नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोध घेणे कामी मल्हारपेठ पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने पथकातील पोलीस स्टाफ ने सी. ई. आय. आर. पोर्टल व इतर तांत्रिक बाबीचे आधारे हरवलेले मोबाईल बाबतची माहिती प्राप्त करुन चिकाटीने व अथक परिश्रम करुन सदरची मोहीम राबविल्याने मल्हारपेठ पोलीस ठाणे हद्दीतून नागरीकांचे गहाळ / चोरी झालेले एकूण ३,७३,०००/- रुपये किमतीचे एकूण १७ मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधिक्षक सविता गर्जे यांचे मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक श्री. नितेश पोटे, पोलीस उपनिरीक्षक श्री. रामराव वेताळ, पोलीस कॉन्स्टेबल श्री. सिध्दनाथ शेडगे यांनी केली.

आज मल्हारपेठ पोलीस ठाणे अंतर्गत मोबाईल शोधण्याची मोहीम राबविण्यात आली. सदरची मोहीम पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधिक्षक सविता गर्जे, यांचे मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. चेतन मछले यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना सांगितले.