आम्ही जे जे बोललो, ते ते खरं करून दाखवलं!; ‘किसनवीर’च्या कार्यक्रमात मकरंद आबा पुन्हा बोलले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । किसनवीर कारखान्याच्या नव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रतीपण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष व वाईचे आमदार मकरंद पाटील व त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनि उपस्थिती लावली होती. यावेळी ‘आम्ही जे जे बोललो ते ते खरं करून दाखवलं, असे महत्वाचे विधान आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांनी केले.

यावेळी सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, वाई तालुका सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, खंडाळा कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, बाळासाहेब सोळसकर, दत्तात्रय ढमाळ, रामराव लेंभे उपस्थित होते.

यावेळी आमदार मकरंद पाटील म्हणाले कि, किसन वीर कारखान्याच्या निवडणुकीत व कारखान्याच्या अनुषंगाने झालेल्या इतर वेगवेगळ्या कार्यक्रमात मी सातत्याने सांगत होतो की, शेतकऱ्यांची सन २०२०-२१ मधील थकीत ऊस बील आम्ही देणार तसेच कारखानाही सुस्थितीत आणणार, याबाबतचे पहिले पाऊल पडलेले असून वार्षिक मिटींगला दिलेल्या शब्दानुसार १५ ऑक्टोबरपर्यंत सन २०२०-२१ मधील शेतकऱ्यांची थकीत ऊस बील खात्यावर वर्ग करणार. याची सुरूवात आज विजयादशमीच्यानिमित्ताने शेतकऱ्यांना अगाऊ हप्ता देऊन करीत आहोत. त्यामुळे आम्ही जे जे बोललो, ते ते खरं करून दाखवलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार हे सत्तेत सामील झाल्याने व आपण त्यांच्याबरोबर राहिल्याने किसन वीर व खंडाळा कारखान्याला शासनाकडून ४६७ कोटी रूपयांचे कर्ज मंजुर झाले. यामुळे दोन्ही कारखान्यावरील लिलावाची प्रकिया थांवली व शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने वाचविण्यात आमचे संचालक मंडळ यशस्वी ठरले असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी म्हटले.