सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कांदाटी खोऱ्यातील बेकायदा जमीन खरेदी-विक्रीचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. नंदूरबारचा रहिवाशी असलेले आणि सध्या अहमदाबाद, गुजरात येथे जीएसटी GST मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी यांनी कांदाटीतील 640 एकर जमीन बळकावल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला आहे. तर त्यांच्यासह एकूण 13 जणांनी झाडाणी (ता.महाबळेश्वर) हे संपूर्ण गावचं खरेदी केले असल्याने याबाबत प्रशासन अनभिग्न कसे काय होतेत? असा प्रश्न सर्वासमोर भा राहिला असताना अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यां लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
झाडाणी हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राच्या नजीकच वसले आहे. याठिकाणी घनदाट जंगल असल्याने येथे वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास आहे. पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986, वन (संरक्षण) अधिनियम, 1976 व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 सारख्या अनेक महत्त्वपूर्ण कायद्यांचे राजरोसपणे नियमित उल्लंघन होत असताना आता जमीन खरेदी प्रकरण समोर आले आहे.
जमीन घोटाळा प्रकरणी झाडाणी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील वडिलोपार्जित जमिनी बळकवणाऱ्या अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी याच्यावर गुन्हा दाखल करून जमिनी परत कराव्यात, अन्यथा दि. १० जूनपासून माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्यासमवेत उपोषणास बसणार असल्याचा इशारा झाडाणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे दिला आहे.
GST आयुक्ता विरोधात ACB विभागाकडे तक्रार
महाबळेश्वर तालुक्यातील पुनर्वसित गावची संपूर्ण जमीन खरेदी करणाऱ्या अहमदाबादच्या मुख्य जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवींच्या अडचणी वाढल्या आहेत. जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनी जीएसटी आयुक्तासह नातेवाईक आणि शासकीय अधिकारी, उदयोगपतींच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे.
‘त्या’ अनधिकृत बांधकामाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर
१३ जणांनी झाडाणी (ता. महाबळेश्वर) हे संपूर्ण गावच खरेदी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून आयुक्तांनी ६४० एकर भूखंड खरेदी करून त्यामधील ३५ एकरावर अनधिकृतपणे केलेले बांधकाम, बेकायदा उत्खनन, खाणकाम, वन्यजीव व वन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना वाई प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सोमवारी अहवाल सादर केला आहे.
कांदाटी खोऱ्यात “मुळशी पॅटर्न”
महाबळेश्वर जवळील अतिदुर्गम व पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कांदाटी खोऱ्यात “मुळशी पॅटर्न” होत आहे. गुजरातचे जीएसटी मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी, त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक मिळून झाडाणी (ता. महाबळेश्वर) हे संपूर्ण गावचं खरेदी केले आहे. यासोबतच तेथील ६२० एकराचा भूखंड बळकावल्याचे वास्तव समोर आले आहे. पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६, वन (संरक्षण) अधिनियम १९७६ व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ सारख्या अनेक महत्त्वपूर्ण कायद्यांचे उल्लंघन केले गेले आहे.
नंदुरबार कनेक्शन?
नंदुरबार जिल्ह्यातून प्रथम सनदी अधिकारी होण्याचा मान पटकावलेले चंद्रकांत रावजी वळवी यांची काही दिवसांपूर्वीच मुख्य आयुक्त (जीएसटी प्रिंसिपल कमिशनर) पदी बढती झाली. गुजरात राज्यातील २ अहमदाबाद येथे विक्री व सेवाकर उपमुख्य आयुक्त म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत वळवी हे नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा तालुका नवापूर येथील रहिवासी असून. सर्वप्रथम आयकर निरीक्षक म्हणून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी सन 1991 मध्ये यश संपादन केले होते. त्यानंतर सनदी अधिकारी होण्याच्या ध्येयाने त्यांनी संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन त्यात यश संपादन केले. भारतीय महसूल सेवा संवर्गात विविध पदांवर त्यांनी यशस्वीपणे कारभार सांभाळला. ते सध्या गुजरात राज्याचे उपमुख्य वस्तू व सेवा कर आयुक्त (जीएसटी) या पदावर कार्यरत आहेत. कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि काम करण्याची सचोटी यासाठी ओळखले जाणारे चंद्रकांत वळवी अचानक जमीन खरेदी प्रकरणात कसे अडकले? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.