गोंदवलेत प्रेमप्रकरणातून घडलेल्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीस बेड्या; आतापर्यंत 5 जणांना अटक

0
1746
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । गोंदवले येथील युवकाच्या प्रेम प्रकरणातून खून केल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी दहिवडी पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली यातील मुख्य सूत्रधार आरोपी असलेल्या सागर माने याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. दरम्यान, मंगळवारी पोलिसांनी फलटणमधून माने याला अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील योगेश पवार याचा जुन्या प्रेमसंबंधामधून निर्माण झालेल्या आर्थिक व्यवहारातून निर्घृण खून करण्यात आला होता. खुनानंतर संशयितांनी त्याचा मृतदेह गाडीमध्ये टाकून तो वाहत्या कालव्यामध्ये फेकून दिला होता. दरम्यान, योगेश बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाइकांनी पोलिसात दिली होती.

पोलिसांनी शिताफीने प्रेयसी रोशनी विठ्ठल माने, तिची आई पार्वती माने, प्रथमेश व अकिल विश्वकर्मा यांना ताब्यात घेतले; परंतु या खुनाच्या कटातील मुख्य सूत्रधार सागर माने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पोलिसांची पथकाने काल त्याला फलटणमधील माकडमाळ येथून ताब्यात घेतले, तर काल अटक केलेल्या संशयितांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे करत आहेत.