सातारा प्रतिनिधी | शिवेनेचे युवानेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे हे सातारा कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान, त्यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. शोले मधील आसरानी सुद्धा सगळीकडे फिरायचा आणि म्हणायचा आधे इधर आधे उधर बाकी मेरे पीछे आओ त्यामुळे ते पीछे कोण आहे का बघायला फिरत असतील, अशी टीका शिंदे यांनी केली.
शिंदे गटाचे नेते महेश शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदे म्हणाले, आम्ही कुठलीही चुकीची गोष्ट केली नाही, आम्ही कुठला ही कायदा मोडला नाही त्यामुळे अपात्र होण्याचा विषयच येत नाही. गावाकडचा एक सरपंच राष्ट्रीय अध्यक्षाने फोन करून सुद्धा अपात्र होत नाही तर सोळा आमदार अपात्र करणं खायची गोष्ट आहे का?
जे विरोधक अपात्र तेचे आरोप करत आहेत ते संजय राऊत किंवा इतर कोणी असतील त्यांनी कधी ग्रामपंचायतची निवडणूक तरी लढवली आहे का? ग्रामपंचायतची निवडणूक न लढलेले लोक आम्हाला आपत्र करण्याच्या गोष्टी करत आहेत, असा टोला शिंदे लगावला.