सातारा जिल्ह्याच्या पाणी प्रश्नाच्या बैठकीत 2 टीएमसी पाण्यास मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी मिळवत आ. महेश शिंदेंनी केला भन्नाट डान्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । वेटणे-रणसिंगवाडी येथील शेतीला पाणी मिळावे यासाठी दोन्ही गावातील ग्रामस्थ गेली 7 दिवसांपासून उपोषनास बसले होते. त्याच्या उपोषणस्थळी आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी भेट दिली. तसेच काल सातारा जिल्ह्याच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जलसंपदामंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेतली असून त्यांनी बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील 4 तालुक्यातील गावांना 2 टीएमसी तसेच वेटने-रणसिंगवाडी गावांना 0.13 टीएमसी पाणी देण्यास मंजुरी दिली असल्याचे सांगितले. आमदार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनंतर ग्रामस्थांनी त्यांचे उपोषण सोडत आ. शिंदे यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करतात त्यांचे पुष्पगुछ देऊन अभिनंदन केले. यावेळी आमदार शिंदे यांनीही गाण्यावर ठेका धरत कार्यकर्त्यांसोबत डान्स करीत आनंद साजरा केला.

यावेळी आमदार शिंदे यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा केली आणि आपला पाणी प्रश्न मार्गी लावला असून आता आपल्यावरचा दुष्काळाचा कलंक हा कायमचा पुसला गेला असल्याचे सांगितले. यावेळी ते पुढे म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागास पाणी मिळावे यासाठी दोन्ही गावातील ग्रामस्थांकडून गेल्या 7 दिवसापासून उपोषण सुरु आहे. या दोन्ही गावातील पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. त्या प्रश्नी आम्ही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जलसंपदा मंत्री यांची मंत्रालयात भेट घेतली.

त्यांच्या कानावर हा प्रश्न घातला. ३१ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्याच्या दालनात सातारा जिल्ह्याच्या पाणी वाटपाच्या फेर नियोजनासाठी बैठक घेण्यात आली होती. कोरेगाव मतदार संघातील पाणी वाटपाचाही या बैठकीत निर्णय झाला. यावेळी त्यांच्यासोबत चर्चेअंती मुख्यमंत्री शिंदे व जलसंपदा मंत्री यांनी मंजुरी दिल्यामुळे आता आपला पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. त्यामुळे आतापर्यंत आपल्याला दुष्काळामुळे पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. तो कायमचा मिटणार आहे.

आमदार शिंदे यांनी केलेवल्या प्रयत्नानंतर गावातील भारावलेल्या ग्रामस्थांनी तसेच उपोषणकर्त्यानी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यानंतर कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी केली. यामुळे भारावलेल्या आमदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांसोबत डांन्स करत आनंद साजरा केला.