महाराज आमची चूक झाली म्हणत; कराडला युवकाचे नाक घासत आत्मक्लेश आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेनंतर याचे पडसाद संपूर्ण राज्यभर पडत असतानाचे पाहायला मिळत असताना, साताऱ्यातील माण येथील महेश करचे या युवकाने महाराज आमची चूक झाली, असे म्हणत कराड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळपर्यंत तीन किलोमीटर दंडवत घालुन रस्त्याला नाक घासत आत्मक्लेश आंदोलन केले.

माण तालुक्यातील महेश करचे या युवकाने शनिवारी केलेल्या या अनोख्या आंदोलनाची चांगलीच चर्चा कराड शहरात सुरू होती. यावेळी करचे यांनी येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनास प्रारंभ केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ला येथील काहीच महिन्यापूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. यावेळी आमच्या मतदानाच्या हक्कावर आले आणि महाराजांना लुटले, चुक झाली जनतेची म्हणुन घेतो आम्ही प्रायचित्त, महाराज आम्हाला माफ करा, तुमचा वारसा आम्हाला झेपत नाही असे फलक हातात घेवुन आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांना नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.