सातारा प्रतिनिधी । महावितरणकडून आर्थिक वर्षातील थकबाकी वसुलीसाठी नियमित प्रयत्न केले जातात. दरम्यान, आता मार्च महिना संपत आला असून आठ दिवसात तब्बल ११८ कोटी २९ रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट्य सातारा जिल्ह्यातील वीजवितरणपुढे देण्यात आले आहे. मार्च अखेरमुळे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वीज वीजवितरच्या वसुलीची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी वीजजोड तोडणी केली जात असून थकबाकी व पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच वीजपुरवठा पूर्ववत केला जात आहे.
थकीत वीजबिल वसुलीचे टार्गेट महावितरणने पूर्ण करण्यासाठी विभागून दिले असून वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश सर्व कर्मचाऱ्यांना दिले आहेत. वापरलेल्या विजेचे बिल वेळेत भरणे ही ग्राहकांचीदेखील जबाबदारी आहे. परंतु, काही ग्राहक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महावितरणला वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागते.
आतापर्यंत ५९ कोटी ४ लाख वसुली
सातारा जिल्ह्याला ११८ कोटी २९ लाखांचे वसुलीचे टार्गेट देण्यात आले असून पन्नास टक्के वसुली झाली आहे. आतापर्यंत ५९ कोटी ४ लाख वसुली झाली आहे. वसुलीची मोहीम अधिक युद्ध पातळीवर राबविली जात आहे. त्यामुळे महावितरणने आता एक महिना वीजबिल थकीत असल्यासही कारवाई सुरू केली आहे.
कोणत्या तालुक्यात किती थकबाकी
सातारा विभाग : ३६ कोटी ९७ लाख थकबाकी
वडूज विभाग : १४ कोटी ९९ लाख थकबाकी,
कराड विभाग : ३० कोटी १३ लाख थकबाकी,
फलटण विभाग : १९ कोटी ४३ लाख थकबाकी,
वाई विभाग १६ कोटी ७८ लाख थकबाकी