महात्मा गांधी विद्यालय कालेचे शिक्षक किरण कुंभार सर रेखाटणार अयोध्येतील राम मंदिर परिसरात चित्रे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । सध्या संपूर्ण देशात राम मंदिर उदघाटन सोहळ्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. येत्या २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उदघाटन होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. राम मंदिर परिसरात काही चित्रे लावण्यात येणार आहे. ही सर्व चित्रे देशातील २० चित्रकारांकडून रेखाटली जाणार आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील काले गावातील महात्मा गांधी विद्यालयाचे कला शिक्षक मा.श्री.किरण गंगाराम कुंभार (सर) यांची निवड झाली आहे. हि नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या काले गावातील महात्मा गांधी विद्यालयाला श्री.किरण गंगाराम कुंभार (सर) हे विद्यार्थ्यांना कलेचे धडे देतात. त्यांची चित्रकला प्रसिद्ध तर होतीच, पण आता थेट राम जन्मभूमी अयोध्येत सुद्धा त्यांनी रेखाटलेली चित्रे संपूर्ण देशाला पाहायला मिळणार आहेत हा एका अर्थाने सातारा जिल्ह्यासाठी आणि रयत शिक्षण संस्थेसाठी अभिमानाचा क्षण आहे. देशातील २० चित्रकारांमध्ये किरण गंगाराम कुंभार सरांचा नंबर लागल्याने पंचक्रोशीतील सर्व जनतेकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे. त्यांच्या या यशाने साताऱ्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रवला गेला आहे.

दरम्यान, श्रीराम मंदिर अयोध्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त प्रत्यक्ष चित्राविष्कार या कार्यक्रमासाठी देशातील २० चित्रकारांमध्ये आपली निवड झाल्याने किरण कुंभार सरानी आभार व्यक्त केले आहेत. ही निवड प्रक्रिया अयोध्येतील रामानंदचार्य ट्रस्टच्यावतीने झाली आहे. त्यांनी आमच्याकडून काही फोटो आधी मागवले आणि मग आमची निवड करण्यात आली. २ सेशन मध्ये ही निवड आहे. १४ ते १७ मध्ये १० चित्रकार असतील आणि १८ ते २२ मध्ये १० चित्रकार असतील. माझी निवड पहिल्या सेशन मध्येच करण्यात आली आहे. राम मंदिर उदघाटन सोहळा या सुवर्णक्षणाचा साक्षीदार होणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया किरण कुंभार सरानी व्यक्त केली.