सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Board 10th Results 2024) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दि. 27 दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी नुकताच दहावीचा निकाल जाहीर केला. राज्याचा दहावीचा 95.81 टक्के लागला असून 16 लाख 21 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 15 लाख 17 हजार 802 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सातारा जिल्ह्यातील 116 परीक्षा केंद्रातून 37 हजार 658 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
सातारा जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांमध्ये १ ते २६ मार्च २०२४ दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली. यंदाच्या वर्षी सातारा जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी प्रशासनाकडून निषेध खबरदारी घेण्यात आली होती. परीक्षा काळात कोणीही कॉपी करणार नाही यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली होती.
यावेळी दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरलाय. नागपूर विभागाचा निकाल सर्वाधिक कमी लागला आहे. राज्याची दहावीच्या निकालाची टक्केवारी 95. 81 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का वाढला असल्याचे शरद गोसावी यांनी सांगितले.
विभागनिहाय निकाल (टक्केवारी)
1) पुणे : 96.44 टक्के
2) नागपूर : 94.73 टक्के
3) छत्रपती संभाजीनगर : 95.19 टक्के
4) मुंबई : 95.83 टक्के
5) कोल्हापूर : 97.45 टक्के
6) अमरावती : 95.58 टक्के
7) नाशिक : 95.28 टक्के
8) लातूर : 95.27 टक्के
9) कोकण : 99.01 टक्के
दहावीचा निकाल कुठे पाहाल?
- https://mahresult.nic.in
- http://sscresult.mkcl.org
- https://sscresult.mahahsscboard.in
- https://results.digilocker.gov.in
- https://results.targetpublications.org/
कसा पाहाल निकाल?
स्टेप 1 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2 : होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नाव नोंदवा.
स्टेप 4 : स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईपर्यंत थांबा.
स्टेप 5 : निकाल उपलब्ध झाल्यानंतर तो पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा त्याची प्रिंट आऊट घ्या.