महाबळेश्वर – तापोळा रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक ठप्प; मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन ठप्प झाले आहे. या पावसाने महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक बंद झाली. दानवली येथे अंगणवाडीच्या भिंतीचाकाही भाग कोसळला तर दुधोशी येथे जि.प. शाळेची भिंत ढासळली. वेण्णालेकजवळ डोंगरावरील माती व दगड रस्त्यावर आले. दरम्यान, महाबळेश्वरमध्ये 24 तासांत या हंगामातील उच्चांकी म्हणजे तब्बल 240 मिमी पावसाची नोंद झाली.

महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड व पाटण तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची तुफान बॅटींग सुरू आहे. पावसाचे आगार असलेल्या महाबळेश्वरमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वर – तापोळा मुख्य रस्त्यावर वाघेरा नजीक सोमवारी महाकाय दरड कोसळली. त्यामुळे मोठमोठे दगड व माती रस्त्यावर आली. दरड रस्त्यावर आल्याने महाबळेश्वर व तापोळा या दोन्ही बाजूकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. तसेच रस्त्यावर सर्वत्र राडारोडा झाला होता.

ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाला समजल्यानंतर उपअभियंता अजय देशपांडे व कर्मचार्‍यांनी ज्या ठिकाणी दरड कोसळली तेथे धाव घेतली. पोकलेन व जेसीबीच्या सहाय्याने ही दरड हटवण्याचे काम दिवसभर सुरू होते. मोठी दरड हटवल्याने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. 15 दिवसांपूर्वीही याच परिसरात दरड कोसळली होती. सोमवारीही दरड पडल्याने वाहतूक बंद झाल्याचे दिसून आले.

महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड व पाटण तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची तुफान बॅटींग सुरू आहे. पावसाचे आगार असलेल्या महाबळेश्वरमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वर-तापोळा मुख्य रस्त्यावर वाघेरा नजीक सोमवारी पहाटे महाकाय दरड कोसळली. त्यामुळे मोठ मोठे दगड व माती रस्त्यावर आली. दरड रस्त्यावर आल्याने महाबळेश्वर व तापोळा या दोन्ही बाजूकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. तसेच रस्त्यावर सर्वत्र राडारोडा झाला होता.

ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाला समजल्यानंतर उपअभियंता अजय देशपांडे व कर्मचार्‍यांनी ज्या ठिकाणी दरड कोसळली तेथे धाव घेतली. पोकलेन व जेसीबीच्या सहाय्याने ही दरड हटवण्याचे काम दिवसभर सुरू होते. सकाळी 9.30 च्या सुमारास मोठी दरड हटवल्याने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. 15 दिवसांपूर्वीही याच परिसरात दरड कोसळली होती. सोमवारीही दरड पडल्याने वाहतूक बंद झाल्याचे दिसून आले.