मधुमित्र ऍडव्हान्स क्लिनिक फॉर डायबेटीस & ओबिसिटी कराडमध्ये TYPE 1 मुलांसाठी मोफत रक्ततपासणी शिबीर संपन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड । मधुमित्र ॲडव्हान्स क्लिनिक फॉर डायबेटीस & ओबिसिटी कराड या ठिकाणी 25 ऑगस्ट रोजी टाईप 1 मधुमेह असणाऱ्या मुलांसाठी मोफत रक्ततपासणी शिबीर संपन्न झाले. मधुमित्र ॲडव्हान्स क्लिनिकच्या मधुमेह तज्ञ डॉ. गौरी ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 40 टाईप 1 डायबेटिस असणाऱ्या लहान मुलांची रक्ततपासणी यावेळी करण्यात आली.

पुण्याचे केइएम हॉस्पिटल आणि मुकुल माधव फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हे मोफत रक्ततपासणी शिबिर पार पडले. यावेळी घेण्यात आलेले टाईप 1 डायबेटिस असणाऱ्यांच्या रक्ताचे नमुने रिसर्च करण्यासाठी केइएम हॉस्पिटलला पाठवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गौरी ताम्हणकर यांनी दिली. यातून टाईप 1 डायबिटीससाठी उपाय करण्याचे आणखी काही मार्ग सापडतील, अशी आशादेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. लहान मुलांमध्ये टाईप 1 डायबिटीसचे वाढते प्रमाण ही अतिशय गंभीर समस्या असल्याचं त्या म्हणाल्या.

TYPE 1 डायबेटीस म्हणजे काय?

मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. टाईप-१ आणि टाईप-२ मधुमेह. टाइप-१ मधुमेह कोणत्याही वयात होऊ शकतो. ही सामान्य लक्षणे मधुमेहामध्ये दिसून येतात.कौटुंबिक इतिहास देखील टाइप 1 मधुमेहाचे कारण असू शकते. अशा स्थितीत शरीर स्वादुपिंडातील पेशींवर हल्ला करते. त्यामुळे इन्सुलिन तयार होत नाही. आपली रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा पेशींवर हल्ला करून त्यांचा नाश करते. खूप तहान लागणे, खूप भूक लागणे, खूप अशक्त वाटणे, दृष्टी धूसर होणे, जखमा भरण्यास वेळ लागणे, स्वभाव चिडचिडा होणे हि या मधुमेहाची लक्षणे आहेत.