ठाकरे सरकारमुळे राज्यात आर्थिक गैरशिस्त केल्यानेच…; साताऱ्यात भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारींचा निशाणा

0
342
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. “केंद्र तसेच राज्य शासनाकडून सवलत, मोफत योजना सुरू आहेत. राज्याचा अर्थसंकल्पही जाहीर होणार आहे, पण मागील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने राज्यात आर्थिक गैरशिस्त केल्यानेच सध्या काही प्रश्न निर्माण झाले आहेत,’ अशी घणाघाती टीका उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केली.

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष भंडारी म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेला सर्वसमावेशी अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा आणि मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. तसेच शेतकरी, गरीब, महिला आणि युवा या विकसित भारताच्या चार प्रमुख स्तंभांना सक्षम करण्याचे कामही अर्थसंकल्पाने केले आहे. या अर्थसंकल्पामुळे तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होणार आहेत.

मागील ७५ वर्षांत राज्यातील ठेकेदार रस्त्यावर कधी आले नव्हते, पण ठाकरे सरकारने आर्थिक गैरशिस्त केल्याने प्रश्न निर्माण झालेत. तसेच राज्यातील बांबू लागवडीच्या प्रश्नावर त्यांनी बांबूपासून इथेनाॅल निर्मिती होणार आहे. यामुळे कितीही बांबू लावला तरी नुकसान होणार नाही. तसेच प्रक्रिया उद्योग तयार केल्याशिवाय ही योजना यशस्वी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले, तर कोयनेची संकलन यादी भाजपने केली. या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही आम्हीच सोडविणार असल्याचे माधव भंडारी यांनी म्हंटले.