“हे बघा, लाभ नायक,” म्हणत मदनदादांची कन्या डॉ. सुरभी भोसलेंचा मकरंद आबांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ मतदारसंघापैकी वाई हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या मतदार संघात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्याचे काम केले जात असल्याचे एका पोस्टरवरून दिसल्याने भाजप नेते मदन भोसले यांच्या कन्या तथा भाजप नेत्या डॉ. सुरभी भोसले यांनी मकरंद पाटील यांच्यावर “हे बघा, लाभ नायक” म्हणत निशाणा साधला आहे.

डॉ. भोसले यांनी नुकतीच एक इंट्राग्राम पोस्ट केली असून त्यात त्यांनी “वाई खंडाळा महाबळेश्र्वरचे आमदार म्हणजे, प्रधानमंत्री सडक योजनेतून झालेलं काम सुद्धा “मीच केलंय”, माझी लाडकी बहिणीचे पैसे “मीच दिलेत”, असा प्रकार त्यांच्याकडून केल्या जात असलेल्या बॅनरबाजीतून दिसत असल्याचे भोसले यांनी म्हटले आहे.

डॉ. सुरभी भोसले यांनी केलेल्या इनस्ट्राग्राम पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, “हे बघा, लाभ नायक !!! “माझी लाडकी बहीण योजना” यात राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचा काहीच वाटा नाही का? लाडकी बहीण योजना हा महायुतीचा निर्णय आहे का एकट्या राष्ट्रवादीचा?! या पॅम्प्लेट वरून तरी असच दिसुन येत आहे. माझी लाडकी बहिण या योजनेचा प्रचार करत असाल तर त्यात महायुतीतले तिन्ही पक्षांचे चिन्ह आणि नेते हवेत. पण…

वाई खंडाळा महाबळेश्र्वरचे आमदार म्हणजे, प्रधानमंत्री सडक योजनेतून झालेलं काम सुद्धा “मीच केलंय”, माझी लाडकी बहिणीचे पैसे “मीच दिलेत”, शासना कडून झालेली कामं “मीच केलीत”, मदनदादांनी मंजूर करुन आणलेली कामं “मीच केलीत”, अतिरिक्त जिल्हा न्यायालय “मीच आणलाय” हे असे मी मी करणारे आमदार, आता तर राज्य सरकारच्या योजनेचे श्रेय लाटायला पण कमी करेनात. कदाचित शेजारच्या कोरेगावात आणि अख्या जिल्ह्याचा “विकास गाडा” हेच खेचत असावे, असा टोला देखील डॉ. भोसले यांनी लगावला आहे.