तीन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास लोणंद पोलिसांनी सोलापुरातून घेतलं ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | लोणंद पोलीसांच्या वतीने तीन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास सोलापुरातून ताब्यात घेण्यात आले आहे. ऋषीकेश केशव जमदाडे (रा. विठ्ठलवाडी ता. फलटण जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.०१/०६/२०२४ रोजी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे विठ्ठलवाडी ता. फलटण जि. सातारा येथील एक १६ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस रात्रौ ०१.०० वा. चे सुमारास ती तिचे घरी झोपलेली असताना अनोळखी आरोपीने सदर अल्पवयीन मुलीस अज्ञात कारणासाठी तिचे पालकांचे ताबेतून पळवून नेलेवरून लोणंद पोलीस ठाणेस गुन्हा दाखल झाला होता.

सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून जिल्हा पोलीस अधिक्षक मा.श्री. समीर शेख, तसेच अपर पोलीस अधिक्षक मा. वैशाली कडूकर मॅडम व उपविभागिय पोलीस अधिकारी श्री राहुल धस यांनी सदर पीडीतेचे व अज्ञात आरोपीचे तपासाबाबत योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केले होते. गुन्ह्याचा तपास चालू असताना प्रभारी अधिकारी सुशिल भोसले यांनी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री विशाल कदम यांना यथोचीत मार्गदर्शन केले. पोलीस उपनिरीक्षक श्री विशाल कदम यांनी गोपनिय बातमीदारा मार्फत माहीती प्राप्त करून सदरच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याचा प्रकार त्याच गावातील ऋषीकेश केशव जमदाडे रा. विठ्ठलवाडी ता. फलटण जि. सातारा याने केला असल्याचे तसेच सदरचे घटनेपासून तो फरार असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीचे मोबाईल नंबरचे तांत्रीक माहीतीचे आधारे पोलीस उपनिरिक्षक विशाल कदम व त्यांचे मदतनीस पोलीस कॉन्स्टेबल सुनील नामदास ब.नं. १४३१ यांनी इत्यंभूत माहीती प्राप्त करून घेवून त्याचे विश्लेषनाआधारे आरोपी हा मौजे तळे हिप्परगा ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर येथे राहत असलेबाबत समजले. सदरील गजबजलेले ठिकाण असतानाही तसेच रात्रीची वेळ असतानाही पीएसआय कदम व पोलीस कॉन्स्टेबल सुनील नामदास ब.नं. १४३१ यांनी बुध्दीकौशल्याने तपास करून पीडीत मुलगी व आरोपी ऋषीकेश केशव जमदाडे रा. विठ्ठलवाडी ता. फलटण जि. सातारा याला मौजे तळे हिप्परगा ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर येथून ताबेत घेवून तीन महीण्यांपूर्वीचा अल्पवयीन पीडीताचे अपहरणाचा गुन्हा उघडकीस आणला.

मा.श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक, मा.वैशाली कडूकर मॅडम अपर पोलीस अधिक्षक, श्री राहुल धस, उपविभागिय पोलीस अधिकारी फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. सुशील भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विशाल कदम पोलीस उपनिरीक्षक, पो.हवा. सर्जेराव सुळ बं.नं.२२६०, पो.कॉ. सुनील नामदास बंनं १४३१, पो. कॉ. विठ्ठल काळे बंनं १४८३ यांनी सदर कारवाईत भाग घेतला आहे. लोणंद पोलीस स्टेशनचे श्री. सुशील भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. विशाल कदम, पोलीस उपनिरीक्षक तसेच त्यांचे सहका-यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.