सातारा प्रतिनिधी । लोणंद पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकली आणि विहीरिवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात लोणंद पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक करून १ लाख ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक साो सातारा समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो. आंचल दलाल मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस सो, यांनी सुचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे वरीष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरुन लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. सुशिल भोसले, सहाय्यक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर घडणा-या गुन्हयांबाबत गोपणीय खब-यांमार्फत माहीती मिळवुन मिळाले माहीतीचे आधारे यातील आरोपी निष्पन्न केले.
दिनांक ०६/०८/२०२४ रोजी यातील आरोपी हे सासवड ता. पुरंदर येथे असलेबाबत माहीती मिळाल्याने मा. वरीष्ठ अधिकारी सो. यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुशिल भोसले, सहायक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपीना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले. त्यांचेकडे अधिक विचारपुस केली असता त्यांने व त्याचे साथीदारांनी मिळून लोणंद पोलीस ठाणेचे हद्दीत मोटार सायकल चोरीचे २ व विहीरिवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरीचे ३ गुन्हे केलेची कबुली दिली असुन आरोपींकडुन मोटरसायकली व इलेक्ट्रीक मोटारी, असा एकुण १,०७,००० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक साो सातारा समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे हवालदार संतोष नाळे, सर्जेराव सुळ, विठ्ठल काळे, केतन लाळगे, अभिजित घनवट, संजय बनकर यांनी ही कारवाई केली.