कराड प्रतिनिधी । राज्यात चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचा डंका वाजवणाऱ्या मलकापूर नगर परिषदेच्या हद्दीतील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. नागरी वस्तीत सुरू असलेल्या एका मोटर वाइंडिंगच्या शॉपच्या वाहनांमुळे पाईप लिकेज होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. ते मोटर वाइंडिंगचे शॉप बंद करण्यासाठी शिक्षक कॉलनीतील रहिवाशांनी नगरपरिषदेला निवेदन दिले आहे.
मलकापूरात राहत असलेल्या स्थानिक रहिवाशांनी नगरपरिषदेत जाऊन प्रशासनास शॉप बंद करण्याबाबत नुकतेच मागण्याचे निवेदन दिले. यावेळी दिलेल्या निवेदनानुसार मलकापुरात असलेल्या या शॉपमधील कामगार महिलांना त्रास देत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची रहिवाशी महिलांनी केली आहे. तसेच नगरपरिषदेने दखल न घेतल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील महिलांनी दिला आहे.
मलकापूर नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. मात्र, नगरपरिषदेकडून दुर्लक्ष केले जात आहे. जर आमच्या मागण्यांची दखल नगरपरिषद प्रशासनाने घेतली नाही तर नगरपरिषदेविरोधात कोर्टात ही धाव घेणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी महिलांनी सांगितले.