कराड प्रतिनिधी । सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कराड तालुक्यातील हजारमाची गावच्या हद्दीतील स्मशानभुमी परिसरातून रेकॉर्डवरील आरोपीस शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडून 70 हजार 400 रूपये किंमतीचे देशी बनावटीचे 1 पिस्टल आणि 2 जिवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली आहेत. अभिषेक संजय पाटोळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून तीन दिवसात दुसरी कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी बेकायदा बिगर परवाना स्वतःचे जवळ पिस्टल बाळगणारे इसमांची माहिती काढली होती. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिलेल्या. त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, अमित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करुन त्यांना अवैध शस्त्रांबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार काल शुक्रवार, दि. 18 रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना माहिती प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी अभिषेक संजय पाटोळे (रा. शिवाजी स्टेडीयम झोपडपट्टी, ता. कराड, जि. सातारा) हा हजारमाची गावचे हद्दीत पिस्टल विक्री करण्याकरीता येणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी सदरची माहिती पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व अमित पाटील यांचे पथकास दिली. आणि त्यांना संबंधित इसमास ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
स्मशानभूमीत सापळा रचून ‘त्यांनी’ रेकॉर्डवरील आरोपीस केली अटक pic.twitter.com/YmtjC5VvxT
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) August 19, 2023
त्यानंतरच तपास पथकाने हजारमाची, ता. कराड गावचे हद्दीतील ओढ्याजवळील स्मशानभुमी जवळ जाऊन सापळा रचला. त्याठिकाणी संबंधित इसम आल्यानंतर पथकाने तात्काळ इसमास ताब्यात घेवून त्याची अंगझडती
घेतली असता त्याच्याकडे ७० हजार ४०० रुपये किमतीचे १ देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळून आली. तसेच त्याच्या विरुध्द कराड शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ९६७ / २०२३ भारतीय हत्यार अधिनियम ३, २५ अन्वये नोंद करण्यात आला आहे. तर या पथकाने नोव्हेंबर २०२२ पासून एकूण ३९ देशी बनावटीची अग्निशस्त्रे व ५५ काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत.
पोलीस अधीक्षक समीर शेख पोलीस, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, अजय जाधव, अमित झेंडे, अविनाश चव्हाण, अमित माने, स्वप्नील कुंभार, अरुण पाटील, गणेश कापरे, मोहन पवार, अमित सपकाळ, मनोज जाधव, विक्रम पिसाळ, ओंकार यादव, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, मयुर देशमुख, वैभव सावंत, मोहसिन मोमीन, संकेत निकम, शिवाजी गुरव, संभाजी साळूंखे यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.