राज्यातील 13 साखर कारखान्यांना 1898 कोटींची कर्जहमी; सातारा जिल्ह्यातील 2 कारखान्यांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही सहकारी साखर कारखान्यांना तब्बल १८९८ कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे आचारसंहिता लागू होण्या अगोदर मंत्रीमंडळाच्या उपसमितीने या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

सातारा जिल्ह्यातील किसनवीर आणि खंडाळा या कारखान्यांचा कर्जहमी देण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये समावेश आहे. दोन्ही कारखान्यांना तब्बल ४५५ कोटींची थकहमी दिली जाणार आहे. यामध्ये किसनवीर कारखान्याला ३०५ कोटी तर खंडाळा कारखान्याला १५० कोटींची थकहमी मिळणार आहे.

राज्य सरकारकडून राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या माध्यमातून कर्ज घेऊन साखर कारखान्यांना दिले जाणार आहे. मान्यता देण्यात आलेल्या प्रस्तावाबाबत सांगायचे झाले तर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील साखर कारखान्यांच्या प्रतिनीधींकडून सरकारकडे खेळत्या भांडवलावरील कर्जाच्या मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला होता.

यावर आचारसंहितेपूर्वी प्रस्ताव पाठवलेल्या कारखान्यांची छाननी करून त्यानुसार सरकारच्या हमीवर कर्जाचे प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगमला पाठविण्यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपला समर्थन करणाऱ्या १३ साखर कारखान्यांची समितीने निवड केली. हि निवड करताना भाजपचे ५ राष्ट्रवादीचे ७ आणि एक कारखाना काँग्रेसशी संबंधित आमदाराचा आहे. दरम्यान, कर्जहमीचा प्रस्ताव एनसीडीसीला पाठविण्यात आला असून त्यांची मान्यता मिळताच कर्जाची रक्कम सरकारकडे जमा होणार आहे.

कर्जहमी देण्यात आलेली कारखाने

1) लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखाना (बीड) १०४ कोटी

2) किसनवीर (सातारा)३५० कोटी

3) किसनवीर (खंडाळा) १५० कोटी

4) लोकनेते मारोतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना(नेवासा) १५० कोटी

5) अगस्ती (अहमदनगर) १०० कोटी

6) अंबाजोगाई (बीड)८० कोटी

7) शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) ११० कोटी

8) संत दामाजी(मंगळवेढा)१०० कोटी,

9) वृद्धेश्वर (पाथर्डी)९९ कोटी

10) सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे ( कोपरगाव) १२५ कोटी

11) तात्यासाहेब कोरे वारणानगर (कोल्हापूर) ३५० कोटी

12) बसवराज पाटील यांचा विठ्ठलसाई (धाराशिव) १०० कोटी