सातारा तालुक्यातील ‘या’ गावात बाटली आडवीचा ठराव सर्वानुमते मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील पाडळी गावात महिलांच्या पुढाकाराने दारूबंदी ठरावाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. पाडळी गावाचा संपूर्ण तालुक्यात ज्योतिर्लिंग देवाचा वारसा तसेच शिक्षकांचे गाव असा परिसरात नावलौकिक आहे. तसेच या गावात अलीकडच्या काळात दारू विक्रीच्या माध्यमातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊ नये या भावनेतून गावातील महिलांनी ग्रामपंचायतीला संपूर्ण दारूबंदीचा ठराव करावा, अशी मागणी एकमुखाने केली होती. पाडळी येथील महिलांनी यापूर्वी बोरगाव पोलिस ठाण्यात दारूबंदी संदर्भात निवेदन दिले होते. गावातील सर्व लोकांनी या दारूबंदी ठरावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

पाडळी गावातील ग्रामस्थांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे गावात मिळणारी अवैध दारू विक्री अखेर बंद झाली आहे. यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होण्यापासून वाचणार आहे. त्यामुळे महिलांनी केलेल्या या ठरावाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

पाडळी ग्रामपंचायतीत झालेल्या ठरावावेळी सरपंच अमरसिंह ढाणे, वा उपसरपंच प्रणाली ढाणे, पोलिस मित्र समिती सातारा जिल्हा अध्यक्ष स्वाती ढाणे, महेश ढाणे, जयश्री बाचल, ग्रामविकास अधिकारी रावसाहेब व भोकरे, पोलिस पाटील रुपाली गुरव, आशा महाडिक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचतगट व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.