कराड प्रतिनिधी । कराड येथील क्रीडा क्षेत्रांमध्ये मोठं नाव लौकिक असलेल्या लिबर्टी मजदूर मंडळाच्या संचालक शिष्टमंडळाने आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांची भेट घेतली. यावेळी अत्याधुनिक व्यायाम साहित्य खरेदी करण्यासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे. दरम्यान या निवेदनाची तात्काळ दखल घेत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य क्रीडा आयुक्तांशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली तसेच 10 लाख रुपयेचा निधी देण्याची शिष्टमंडळाला ग्वाही दिली.
यावेळी शिष्टमंडळामध्ये “लिबर्टी” मंडळाचे उपाध्यक्ष अरुणराव जाधव, ज्येष्ठ संचालक एड. मानसिंगराव पाटील, मुनीर सावकार, रणजीतनाना पाटील, रमेश जाधव, विजय गरुड, किशोर शिंदे, काशिनाथ चौगुले व खेळाडू उपस्थित होते.
यावेळी आ. चव्हाण यांनी मागील 70 वर्षापासूनच्या लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडा क्षेत्रामधील कामकाजाबद्दल प्रशंसोदगार व्यक्त केले. तसेच नव्या अत्याधुनिक व्यायाम साहित्य खरेदीच्या कामे शासन स्तरावरील सर्व ते सहकार्य करण्याचे सांगून “लिबर्टी” मंडळाच्या कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.