भारतीय संविधानाने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला : श्री.सुभाष वारे

0
116
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । भारत देशातील दिन,दलित,वंचित,बहुजन आणि आदिवासींची जगण्याची साधने प्रस्थापितांनी हिसकावली असून त्यांच्या जगण्याची मूल्ये ही पायदळी तुडवली जात आहेत. भारतीय संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता इत्यादी जीवनावश्यक मूल्ये दिली असून संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे‌. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध वक्ते श्री.सुभाष वारे यांनी केले.

श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे, महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद, कोल्हापूर आणि इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विभाग आयोजित अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘भारतीय राज्यघटना: काल, आज आणि उद्या’ या विषयावरील एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये बीजभाषक म्हणून बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.(डॉ.) सतीश घाटगे, कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथील राज्यशास्त्र विभागाचे अध्यक्ष प्रो.डॉ.बी.एम.रत्नाकर, प्रा.डॉ.सुभाष कांबळे, समन्वयक प्रा.सचिन बोलाईकर आदि उपस्थित होते.

यावेळी श्री. सुभाष वारे पुढे म्हणाले की, संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिला असून हे संविधान तळागाळातील जनसामान्य माणसांपर्यंत पोहोचणे व त्याचे संरक्षण करणे काळाची गरज बनले आहे. याप्रसंगी चर्चासत्राचे उद्घाटक श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच सहसचिव(अर्थ) म्हणाले की, संविधान हे देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे सर्वश्रेष्ठ दस्तऐवज असून आजच्या काळात संविधानातील मूल्य टिकवणे आव्हान बनले आहे. संविधानाचं प्रचार आणि प्रसार करून त्याचे रक्षण करणे हे भारतीय प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

चर्चासत्राचे साधन व्यक्ती कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथील राज्यशास्त्र विभागाचे अध्यक्ष प्रो.डॉ.बी.एम.रत्नाकर म्हणाले की, भारतीय संविधान निर्मितीत महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे रहिवासी होते. तसेच संविधान हे देशाची कायदा अशी व्यवस्था सुरळीत ठेवण्याची व समाजाला योग्य न्याय देण्याची कार्य करीत असते. भारतीय राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ असून तिचे पालन करणे हे सर्व भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे.

चर्चासत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.(डॉ.) सतीश घाटगे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान हे मोठ्या कष्टातून सर्वसमावेशक व अभ्यासपूर्ण असे निर्माण केले आहे. पण आज संविधानासमोर भारतीय धर्मांधतेचे फार मोठे आव्हान असून त्याला सक्षमपणे सामोरे गेले पाहिजे. याप्रसंगी चर्चासत्राच्या तिसऱ्या सत्रामध्ये ‘भारतीय राज्यघटना: काल आज आणि उद्या’ या विषयाच्या अनुषंगाने विविध शोधनिबंधांची वाचन करण्यात आले. समारोप समारंभ प्रसंगी प्रा.डॉ.सुभाष कांबळे म्हणाले की, संविधानाचा जागर करणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. तरच खऱ्या अर्थाने आपण संविधान समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवू शकतो.

प्रास्ताविक चर्चासत्राचे समन्वयक प्रा.सचिन बोलाईकर, डॉ.एम.एस.सुर्यवंशी, सदस्य जोतीराम आंबवडे,प्रा.दिपाली वाघमारे यांनी यांनी सूत्रसंचालन प्रा.अभिजीत दळवी, प्रा.प्रियांका मदने , प्रा‌.विश्वनाथ सुतार, डॉ.शितल गायकवाड, प्रा.जयदिप चव्हाण यांनी तर आभार प्रा.रत्नाकर कोळी, डॉ.दादासाहेब घाडगे,प्रा.युवराज कापसे, प्रा.तेजस्विनी दळे यांनी मानले. चर्चासत्रासाठी विविध राज्यातून, जिल्ह्यातून व महाविद्यालयातून शोधनिबंध वाचक व सहभागी प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी -विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.