निवडणूक निरीक्षकांकडून कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या स्ट्राँग रूमसह मशीन्सची पाहणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर पाठविण्यासाठी मतदान यंत्रे तयार करून सुरक्षितपणे ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूमला तसेच मतदान यंत्र तयार करण्याचे काम सुरू असलेल्या सिलिंग हॉलला आज निवडणूक निरीक्षण गीता ए. यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान प्रथम त्यांनी मशीन्सच्या सिम्बॉल लोडिंगची तपासणी करून १००% यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी निरीक्षकांसमवेत असलेले एक्झिक्यूटिव्ह  इंजिनियर घनवट, डेप्युटी इंजिनियर चौधरी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, आचारसंहिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, प्रभारी नायब तहसीलदार युवराज पाटील, निवासी नायब तहसीलदार बाबुराव राठोड, नायब तहसीलदार व्ही.आर.रजपूत, गोपाल वसू उपस्थित होते.

यावेळी निवडणूक निरीक्षक गीता ए यांनी २० मशीन्सवर ५ टक्के मोकपॉल व्यवस्थितपणे सुरू आहे का याचीही चाचपणी केली. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींशीही त्यांनी चर्चा करत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि कामकाजाबाब पडताळणी केली. यावेळी निवडणूक निरीक्षक गीता ए यांनी ३९ टेबलवर सेक्टर ऑफिसर्स व त्यांच्या टीमकडून तयार करण्यात येत असलेल्या मतदान यंत्रांच्या कामकाजाचा प्रत्येक टेबलवाईज आढावा घेतला व युद्ध पातळीवर सुरू असलेल्या एकंदरीत कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. यादरम्यान त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी एकूण कार्यरत असलेल्या यंत्रणेबाबत व त्यासाठी केलेल्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.