सातारा प्रतिनिधी । खंडाळ्याच्या गोकुळ लॉजवरील कुंटणखान्यावर LCB चा छापा टाकला असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विनोद गोविंद अग्रवाल (वय ५२, रा. धनगरवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा) आणि एक महिला अशी ताब्यात घेतलेले दोघे जण आहेत. त्यांच्या विरुध्द शिरवळ पोलीस मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी जिल्ह्यात बेकायदेशीर चालणाऱ्या कुंटणखान्याची माहिती प्राप्त करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके यांना सातारा कुंटणखान्यांची माहिती प्राप्त करुन कारवाईचे आदेश दिले. याच दरम्यान, दि.२२/०८/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसमांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील शिंदेवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा गावाचे हद्दीतील गोकुळ लॉजवर वेश्यागमनाकरीता मुली ठेवल्या असून मागणी प्रमाणे त्याठिकाणी पुरुष ग्राहकांना मुली पुरविल्या जात आहेत.
या माहितीवरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके यांचे पथकास छापा टाकण्याचा आदेश दिला. शिरवळ पोलिसांच्या मदतीने छापा टाकून कुंटणखाना चालविणाऱ्या विनोद गोविंद अग्रवाल (वय ५२, रा. धनगरवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा) आणि एक महिला, अशा दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुध्द शिरवळ पोलीस मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, शिरवळचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने,पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके, पोलीस अंमलदार दीपक मोरे, अतिश घाडगे, राम गुरव, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, लैलेश फडतरे, मोहन पवार, गणेश कापरे, पंकजा जाधव, मोनाली निकम, माधवी साळूंखे, क्रांती निकम, आदिका वीर, अनुराधा सणस, दलजित जगदाळे, शिरवळचे पोलीस उपनिरीक्षक आंदेलवार, पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर, सचिन मोरे यांनी केली आहे.