सातारा प्रतिनिधी | जकातवाडी, ता. सातारा येथे शारदाश्रम, जकातवाडी येथे महिलांना शिलाईकाम व त्यासंदर्भातील इतर उद्योगांचे प्रशिक्षण व रोजगार निर्मिती केंद्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी आर्थिक स्थिरतेशिवय सामाजिक सबलीकरण शक्य नाही, कुटुंबाला सुदृढ करण्यासाठी घरातील स्त्रियांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ राहील पाहिजे व त्यासाठी कुटुंबाचा आर्थिक कणा मजबूत होणे गरजेचे आहे. जर कुटुंब सक्षम झाली तर समाज आणि देश सक्षम व स्वावलंबी होतील, असे प्रतिपादन पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केले.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक पद्मश्री लक्ष्मण माने, खजिनदार शशिताई माने, यू पी एस लॉजिस्टिक्सचे एच.आर. सयाजी चव्हाण, युथ एड फाऊंडेशनच्या प्रमुख ज्योत्स्ना बहिरट, प्रा. भाईशैलेंद्र माने, डॉ.समता माने, डॉ.शाली जोसेफ, प्रा.जीवन बोराटे, सातारा जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे एच.आर. डी. ऑफिसर राजेश भोसले,सामाजिक कार्यकर्ते संकेत माने आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वयंरोजगार निर्मितीसाठी आवश्यक असणारे सर्व प्रशिक्षण देण्यासाठी हे केंद्र उभारले असून या केंद्रास सर्वोतपरी मदत करणार असल्याची ग्वाही यू पी एस लॉजिस्टिक्सचे एच आर सयाजी चव्हाण यांनी दिली. प्रास्ताविक प्रा. जीवन बोराटे यांनी केले तर आभार प्रा. संकेत माने यांनी मानले.