सातारा प्रतिनिधी । राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिल्यानंतर आरक्षण देण्यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरु केले आहे. साताऱ्यात स्वागत सभेतून जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला देखील इशारा दिला आहे. त्यांच्या सातारा येथील इशाऱ्यानंतर त्यांना विविध संघटनाकडून पाठींबा दिला जात आहे. दर,दरम्यान, राज्य मागासवर्गीय आयोगाकडूनही मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी कामकाज सुरु आहे. मात्र आयोगातील मतभेद उघड झाले आहे. आयोगाचे सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सदस्य लक्ष्मण हाके यांनी पत्राद्वारे राजीनामा दिला आहे.
राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके हे गेल्या दोन आठवड्यात झालेल्या मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीला हाके हे उपस्थित होते. मात्र, हाके यांनी आयोगाला सदस्यतेचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी आयोगाच्या बी. एस. किल्लारीकर यांनी सुद्धा राजीनामा दिला होता.
सर्व समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी किल्लारीकर यांनी केली होती. परंतु, याबाबत एकवाक्यता न झाल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता हाके यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे.
सध्या राज्याची सामाजिक परिस्थिती ठीक नाही. त्यामुळे एका समाजाचे सर्व्हेक्षण करण्यापेक्षा सर्व समाजाचे सर्व्हेक्षण करावे. जाती आधारित सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण करणे चांगले ठरेल. यामुळे प्रत्येक समाजाची खरी स्थिती समोर येईल, असे बी. एस. किल्लारीकर यांनी म्हंटले.
लक्ष्मण हाके यांनी पत्रात काय म्हटलं ?
मी लक्ष्मण सोपान हाके, सदस्य महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग या पदावर जून 2023 पासून कार्यरत असून, दिनांक 9/12/2023 रोजी झालेल्या बैठकीत माझ्या व आयोगाच्या वैचारीक मतभेदामुळे व्यथित होऊन माझ्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.