कोयना, नवजा, महाबळेश्वरला पावसाचा जोर वाढला; कोयना धरणात ‘इतका’ TMC झाला पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात आठ दिवसानंतर पावसाने पुन्हा जाेर धरला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी सध्या पाऊस पडत असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेत 139 आणि महाबळेश्वरात 74 तर नवजा येथे 148 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणात सध्या 15.61 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

सातारा जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस ७ जूनपूर्वीच दाखल झाला. मागील १५ दिवसांत पूर्व आणि पश्चिम भागातही पावसाने हजेरी लावली. सध्याही पाऊस सुरूच असून मध्यंतरी पावसाचे प्रमाण कमी झाले होते. तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस लवकर सुरू झाला आहे. आतापर्यंत माण, खटाव, फलटण या तालुक्यात चांगला पाऊस पडल्यामुळे शेती मशागती आणि खरीप हंगामातील पेरणीच्या कामाला वेग आला आहे.

चांगल्या पावसामुळे पूर्व भागातील ओढ्यांना पाणी वाहत आहे. अनेक गावांतील बंधाऱ्यात चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पेरणीनंतर पिकांना पाणी कमी पडणार नाही. तसेच तलावातही साठा वाढला असल्याने पिण्याच्या पाणी योजनांना फायदाच होणार आहे. त्यामुळे अनेक गावांचे टँकरही बंद झाले आहेत. पश्चिम भागातही पाऊस पडत असला तरी जोर नव्हता. गुरुवारी सकाळपासूनच पश्चिम भागात पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. यामुळे ओढे खळाळून वाहत आहेत. कास, बामणोली, कोयना, नवजा, तापोळा, महाबळेश्वर भागात पावसाची जोर वाढला आहे. त्यामुळे प्रमुख धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.

Koyna Dam

Date : 21/06/2024
Time : 08:00 AM
Water level : 2044”01” (623.037m)

Dam Storage :
Gross : 15.61 TMC (14.83%)
Live : 10.49 TMC (10.47%)

Discharges
KDPH : 00 Cusecs.
Total Discharge in koyna River : 00 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna – 139/439
Navaja – 148/552
Mahabaleshwar – 74/361