कराड प्रतिनिधी । मध्य रेल्वेच्या (Central Railway) पुणे विभागातील पुणे-मिरज रेल्वेमार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे सेक्शनमध्ये रेल्वे ट्रॅकचे दुहेरीकरनाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवार, दि. २२ फेब्रुवारीपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. परिणामी आज दि. १७ आणि उद्या १८ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरहून सुटणारी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस (Koyna Express) ही गाडी कोल्हापुरातून दोन तास उशिरा सुटणार आहे.
कोल्हापूरहून सुटणारी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस (Koyna Express) ही गाडी ८:१५ या वेळेत सुटते. मात्र, गाड्यांचे वेळापत्रक बदलल्याने ही गाडी ८:१५ एवजी आता रात्री १०:१५ वाजता म्हणजेच दोन तास उशिराने सुटणार आहे. तसेच दि. १९ फेब्रुवारी रोजी पुण्याहून सुटणारी पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस सेक्शनमध्ये एक तासासाठी रेग्युलेट केली आहे.
त्याचप्रमाणे गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस (Gondia-Kolhapur Maharashtra Express) दि. २१ फेब्रुवारीला पुण्यापर्यंत धावणार असून ही गाडी पुणे-कोल्हापूर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. आणि कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस दि. २२ फेब्रुवारीला पुण्यातून सुटणार असून ही गाडी कोल्हापूर-पुणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे.