Koyana Dam : कोयना धरण क्षेत्रात मागील २४ तास नॉनस्टॉप पाऊस! नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी, पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । कोयना धरणाच्या (Koyana Dam) पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये आवक वाढली आहे. सध्या कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहाचे एक युनिट कार्यान्वित असून कोयना नदीमध्ये 1050 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. मागील २४ तासात नॉनस्टॉप पाऊस सुरु असल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे.

उद्या दि. 27 जुलै 2023 रोजी दुपारी 4:00 वा. कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातील दुसरे युनिट सुरू करणे नियोजित आहे. यामुळे कोयना नदीमध्ये सोडणेत येणारा एकूण विसर्ग 2100 क्युसेक्स होईल. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

एनडीआरएफचे पथक सातारा जिल्ह्यात दाखल

भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुके (पाटण महाबळेश्वर वाई जावली व सातारा) या ठिकाणी अतिवृष्टी सुरू आहे . संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत एनडीआरएफचे एक पथक पूर्वस्थितीत (Pre positioning) सातारा जिल्ह्यात आज कराड या ठिकाणी दाखल झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

या पथकाचे प्रमुख एन डी आर एफ बटालियन पुणेचे इन्स्पेक्टर राहुल कुमार रघुवंश हे आहेत. सदरच्या पथकात अधिकारी व जवान यांचा समावेश असून एकूण 25 जणांचे पथक तैनात असणार आहे. पथकाकडे आवश्यक ते सर्व साहित्य व यंत्रसामग्री उपलब्ध आहे. हे पथक जिल्हा प्रशासनाची समन्वयाने आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करणार आहे. सदरचे पथक कराड येथे दाखल होतात तहसीलदार विजय पवार यांनी त्यांचे स्वागत केले.

कोयना धरणात किती पाणी याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खालील आकडेवारी पहा –

Koyna Dam
Date: 26/07/2023
Time: 05:00 PM
Water level: 2121′ 04″ (646.582m)

Dam Storage:
Gross: 62.41 TMC ( 59.29%)

Inflow: 42,669 cusecs

Discharges
KDPH: 1050 Cusecs.
Total Discharge in koyna River: 1050 Cusecs

Rainfall in mm: (Daily/Cumulative)
Koyna: 51/2391
Navaja: 60/3334
Mahabaleshwar: 46/3149