सातारा प्रतिनिधी । लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कामांकरिता विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या इच्छुक उमेदवारांना आदर्श आचारसंहिता कालावधीत विविध परवानग्यांसाठी परवाने दिले जातात. त्या परवान्यांच्या वितरणासाठी निवडणूक विभागाकडून एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे. कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजमध्ये हा कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती कोरेगावचे उपविभागीय अधिकारी अभिजित नाईक यांनी दिली.
राजकीय पक्ष व उमेदवारांना विविध परवानगी काढण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे. एकापेक्षा अधिक विधानसभा मतदार संघाकरता वाहन परवाना, रॅली, मिरवणूक, जाहीर / कॉर्नर सभा, मेळावे, रोड शो परवाना आदी बाबींचा यामध्ये समावेश राहणार आहे.
सुविधा पोर्टलवर तसेच प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या अर्जाबाबत एनकोअर पोर्टलच्या माध्यमातून परवानगी देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. मीटिंग, सभा, रॅली आर्दीच्या परवानगीसाठी किमान २ दिवस अर्ज करणे आवश्यक आहे. दरम्यान जनजागृतीसाठी प्रशासनातर्फे विविध उपक्रम घेण्यात येत आहे.