सातारा प्रतिनिधी | कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शुक्रवारपासून रविवार अखेर (दि. १०) रोजी पर्यंत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक (८५+) मतदारांचे मतदान गृहभेट देऊन घेण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाचे निर्देश व सूचनेनुसार कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक (८५+) मतदारांना आपले मतदान सुलभतेने करता यावे, यासाठी शुक्रवारपासून रविवारअखेर संबंधित मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान घेण्यासाठी एकूण १६ पथके नेमण्यात आली आहेत.
त्याद्वारे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून दिव्यांग ३७ व ज्येष्ठ नागरिक (८५+) २३५ असे एकूण २७२ इतके मतदार गृहभेट मतदान या उपक्रमाचा लाभ घेणार आहेत, असे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित नाईक यांनी एका पत्रकाद्वारे कळवले आहे.