सातारा जिल्ह्यात मतदानाचा वाढला वेग…; ‘या’ ठिकाणी 11 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यात संथगतीने मतदान झाले. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला असून सकाळी अकरा वाजेपर्यंत जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात चांगले मतदान पार पडले आहे. यामध्ये २५५ फलटण : 17.98, २५६ वाई : 18.55, २५७ कोरेगाव : 21.24, २५८ माण : 15.21, २५९ कराड उत्तर : 18.57, २६० कराड दक्षिण : 19.71, २६१ पाटण : 18.93, २६२ सातारा : 19.97 इतके टक्के मतदान जिल्ह्यात झाले आहे.

जिल्ह्यात मतदान केंद्र परिसर व मतदार संघात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. या पार्श्वभूमीवर आठ विहंसभा मतदार संघात पोलिसांकडून ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे. मतदान प्रक्रिया पार जिल्ह्यातील ३ हजार १६५ मतदान केंद्रांवरून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदानासाठी सेक्टर ऑफिसर ४३६, केंद्राध्यक्ष ३ हजार ९५६ व इतर कर्मचारी ११ हजार ८६९ असे एकूण १६ हजार २६१ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील ८ मतदारसंघांत १०९ जण निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यात १३ लाख ३७ हजार ०७२ पुरुष तर १३ लाख ०५ हजार ६०८ महिला मतदार आहेत. तृतीयपंथीयांची संख्या ११४ आहे. असे २६ लाख ४२ हजार ७९४ मतदार आज बुधवारी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.