कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसची आज झाली चाचणी; तिकीट दर किती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कोल्हापूर – पुणे वंदे भारत एक्सप्रेससंदर्भात एक मोठं अपडेट समोर आलंय. कोल्हापूर-पुणे वंदे भारत सोमवारपासून सुरू होणार आहे. दरम्यान, आठवड्यातून तीन वेळा धावणाऱ्या कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा सोमवारी शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी वंदे भारत एक्सप्रेची चाचणी घेण्यात आली. ठिकठिकाणी प्रवाशांनी ‘वंदे भारत’वर फुलांचा वर्षाव करीत स्वागत केले. कराड येथील रेल्वे स्टेशनवरून एक्स्प्रेस रवाना झाली.

कोल्हापूर – पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला नेमका किती वेळ लागतो ? या मार्गावर अन्य काही अडथळे आहेत का ? याची चाचणी घेण्यात आज घेण्यात आलीय. वंदे भारत आठवड्यातून तीन वेळा कोल्हापूर – पुणे या मार्गावर धावणार आहे. मागील आठवड्यात पुणे ते हुबळी वंदे भारतला कोल्हापूर थांबा प्रस्तावित झाला होता. त्यानंतर वाद वाढला होता.

सोमवारी रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना कोल्हापूर रेल्वे स्थानकावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. कोल्हापूर – पुणे वंदे भारत दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी कोल्हापूर स्थानकातून सकाळी सव्वा आठ वाजता सुटेल आणि दुपारी दीड वाजता पुण्यात पोहोचेल. पुण्याहून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता ही गाडी सुटेल आणि सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी ती कोल्हापुर स्थानकात दाखल होईल.

वंदे भारत एक्सप्रेस तिकीट किती?

ही एक्सप्रेस मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा या स्थानकावर थांबणार आहे. कोल्हापूर पुणे या प्रवासाचे दर चेअर कारसाठी १ हजार १६० रुपये आकारण्यात येईल, तर एक्झिक्यूटिव्हसाठी २ हजार ५ रुपये आकारण्यात येणार आहेत. वंदे भारत कोल्हापूर ते पुणे मार्गावर १६ सप्टेंबरपासून धावणार आहे. प्रदीर्घ संघर्षानंतर कोल्हापूरकरांसाठी गुडन्यूज आहे. त्यांची वंदे भारतची मागणी पूर्ण झालीय. दोन दिवसानंतर वंदे भारत आता प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.