सातारा प्रतिनिधी | मराठी सिने अभिनेते किरण माने यांच्या कुटुंबासाठी आज गुढी पाडव्याच्या शुभ दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. किरण माने यांचे वडील दिनकरराव मारुती माने यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी आपल्या राहत्या घरी, सातारा येथे अखेरचा श्वास घेतला.
अभिनेते किरण माने यांनी स्वतः याबाबतची माहिती आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये माझे नातेवाईक,मित्रमंडळी आणि हितचिंतकांच्या माहितीसाठी… माझे वडील दिनकरराव मारुती माने यांचे आज सातारा येथे राहत्या घरी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आज संध्याकाळी ६ वाजता संगम माहुली, सातारा येथील कैलास स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत,” असे म्हटले आहे.
किरण माने हे मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वातील एक प्रतिभावान आणि संघर्षशील अभिनेते आहेत. ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले. या मालिकेत “विलास पाटील” ही दमदार भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. ”माझ्या नवऱ्याची बायको’, ‘पिंपळपान’, ‘भेटी लागी जीवा’, ‘सिंधुताई माझी माई’ आणि ‘तिकळी’ सारख्या मालिकांमध्ये किरण माने यांनी काम केलं आहे. सध्या ते ‘लई आवडतेस तू मला’या मालिकेत काम करत आहेत.