जिल्ह्यातील ‘या’ ग्रामंपचायतीनं पहिल्यांदा घेतलं असा निर्णय कि त्यामुळे दिसली दुष्काळाची दाहकता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात आज अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. या गावांपैकी एक खातगुण हे गाव होय. या गावात जानेवारीपासूनच पाणी टंचाई जाणवू लागली असून गावासमोर पाण्याचे भीषण संकट उभे राहिले आहे. गावात काही ठिकाणी नवीन बोअरवेल घेण्याचे निदर्शनास आल्यामुळे गावच्या ग्रामपंचायतीने प्रथमच महाराष्ट्र भूजल अधिनियम, २००९ चे कलम लागू केले आहे. पाण्याच्या पाण्यासाठी सद्यस्थितीत असलेल्या सार्वजनिक स्त्रोताच्या ५०० मीटर परिघात बोअरवेल किंवा विहिरी खोदण्यास बंदी घातली आहे. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पाण्याच्या भीषण टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी हे महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यासह खटाव तालुक्यात यावर्षी कमी पाऊस पडल्याने पाण्याचे स्त्रोत लवकर आटले आहेत. त्यामुळे तीव्र पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना खासगी कूपनलिकेवर अवलंबून राहावे लागत आहे. दिवसेंदिवस बोअरवेल वाढत असून त्यातच पाणीपातळी कमी झाल्याने बहुतांश कूपनलिका बंद पडल्या आहेत. खातगुण गावात सद्यस्थितीत गावाला दोन विहिरी व तीन बोअरवेलद्वारे तीन दिवसांतून एकदा पाणी पाणीपुरवठा केला जात आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला या गावटईल लोकाना तोंड द्यावे लागते. लोक पाण्यासाठी बोअरवेल खोदतात आणि जर दुसरा स्रोत जवळ असेल, तर ती बोअरवेल कोरडी पडते. त्यामुळे गावटईल सरपंचसह सदस्यांनी ग्रामसभा बोलवण्याचा निर्णय घेतला. ग्रामसभेमध्ये पाणीटंचाईवर चर्चा देखील करण्यात आली. नवीन बोरवेल खोदण्यासाठी प्रतिबंध कसा घालता येईल? यावर चर्चा पार पडल्यानंतर अखेर चर्चेतून सद्यस्थितीत असलेल्या सार्वजनिक स्त्रोताजवळ बोअरवेल खोदण्यावर बंदी घालण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.