सातारा प्रतिनिधी । सातारा – पुणे महामार्गावर खंबाटकी बोगद्यात स्विफ्ट कारच्या (MH-01 -BG-7760) बोनेटवर गुरुवारी लोखंडी अँगल आदळल्याची घटना गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर वाहनचालकाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने या पार्श्वभूमीवर खंबाटकी बोगद्याचे दुरुस्तीचे कामकाज आज दुपारी 2:30 ते 4:30 या वेळेत केले जाणार आहे. तरी खंबाटकी बोगदा मार्गे सातारा बाजुकडून पुणे बाजुकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
वाई व भुईंज उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने आज पहाटेच्यावेळी घडलेल्या घटनेची दखल घेत प्रवाशी व वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने महत्वाची खबरदारी घेण्यात आली आहे. यामध्ये वेळे येथील खंबाटकी बोगद्याचे दुरुस्तीचे कामकाज आज दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत करण्यात येणार आहे. तरी सातारा बाजुकडून पुणे बाजुकडे खंबाटकी बोगदा मार्गे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
या मार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक हि बोगद्याच्या दुरुस्तीच्या कालावधीत बंद ठेवण्यात आली आहे. तर हलक्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग खंबाटकी घाट मार्गे म्हणून सुरु करण्यात आला आहे. आणि जड वाहनांकरिता पुणे बाजूकडे जाणारी सर्व वाहतूक नमूद वेळेत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सदर वेळेत पुणे बाजूकडे प्रवास टाळावा, असे आवाहन उपविभागी पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.