कास पुष्पपठार शनिवार-रविवार सुट्टीमुळे पर्यटकांनी हाऊसफुल्ल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पावसाळ्यात पर्यटन करण्यासाठी अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यातील खास असे पर्यटनस्थळ म्हणून कास पुष्पपठारास ओळखले जाते. या ठिकाणी पर्यटनाच्या आनंदासाठी देश- विदेशातील पावले पश्चिमेकडे वळून यवतेश्वर, कास, भांबवली, बामणोलीला पर्यटकांची गर्दी होत आहे. संततधारेमुळे मनमोहक निसर्ग खुणावत असून, पर्यटक मोठ्या प्रमाणावर कास परिसरात दाखल होत आहेत. शनिवार, रविवार सलग सुट्टी असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले असून निसर्गाचा आनंद लुटत आहेत.

गर्द हिरवळ, कोसळणारे छोटे-मोठे धबधबे, पावसाच्या सरी अन् दाट धुके काल्पनिक नव्हे तर कास पुष्प पठारावरील वास्तव मनमोहक दृश्य. आपल्या सौंदर्याने जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान पटकावलेले कास पठार सध्या पर्यटकांनी बहरला आहे. जैवविविधतेने नटलेल्या पठारावर फुलांचा हंगाम काही महिन्यांतच सुरू होणार आहे. राज्यभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर पर्यटनास येत आहेत. पर्यटक कौटुंबिक सहलीचे क्षण कॅमेऱ्यात येत आहेत. पर्यटक कौटुंबिक सहलीचे क्षण कॅमेऱ्यात टिपून ठेवत आहेत.

चारचाकी, दुचाकीच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागत असल्याने जलधारा अंगावर झेलत हिरवळीवरून पर्यटक भटकंती करत वाहनांचा ताफा कास धरणाकडे वळत आहे. चालू गाडीतून निसर्गसौंदर्याचा व्हिडीओ शूट करून तरुणाई रस्त्यावर संगीताचा ठेका धरत नृत्य करत आहेत. हजारो पर्यटक कास पठाराला भेट देत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यवतेश्वरला पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी होत आहे.